Description
सॅन्दोर हालमोसी हे हंगेरी येथील बुडापेस्टयेथे वास्तव्यास असून ते कवी, अनुवादक, संपादक गणीतज्ज्ञ असून परंपरा, कविता, भाषा आणि प्रतीके यांविषयी व्याख्यान देतात. ‘पेन क्लब ऑफ बुडापेस्ट’, ‘युरोपियन सायन्स, आर्ट्स आणि लेटर्स अकादमी’ चे सदस्य आहेत. तसेच ते जगभरातल्या लेखक संघटना आणि कवितेच्या वैश्विक वर्तुळाशी संबंधित आहेत. त्यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये ‘साहित्यासाठी आक्रोश’ नावाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
डॉ. संजय बोरुडे हे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लेखन करतात. अनुवादापेक्षा अनुसृजनावर त्यांचा अधिक विश्वास आहे. शिवमूर्ति, विमलेश त्रिपाठी, ज्योति चावला, प्रदीप जिलवाने यांच्यासह अनेक हिंदी साहित्यिकांचे लेखन त्यांनी मराठी भाषेत अनुवाद केले आहे. सॅन्दोर हलमोसी (हंगेरी), कियू बीच हाऊ (व्हिएतनाम) यांच्या पुस्तकांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे. भाषा, नया ज्ञानोदय, परिंदे इ. हिंदी नियतकालिकांतून त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. तसेच अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहे
तात्विक आणि गंभीर स्वरुपाच्या कविता लिहिणाऱ्या हालमोसी यांनी भारतीय दर्शन आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास् केलेला आहे. , जैन, शैव , बौद्ध धर्मातील तंत्राचा अभ्यास करून त्यांनी दहा खंड लिहिले आहेत. त्याचा एक भाग म्हणजे हा संग्रह आहे.


Reviews
There are no reviews yet.